




'आपली सांगली - बदलती सांगली' — तुमच्या सहभागातून घडते आहे!
सांगली जिल्ह्याचा विकास म्हणजे फक्त सरकारी प्रकल्पांची यादी नाही… तो नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि सांगलीतील जनतेचा सहभाग यांनी मिळून घडवलेला एक प्रेरणादायी प्रवास आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे (IAS) यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक सकारात्मक उपक्रम सुरू आहेत. या सर्व प्रयत्नांची, त्यांच्या परिणामांची आणि तुमच्या सहभागाची गोष्ट aapliSangli.in येथे आपण एकत्र अनुभवत आहोत. आपण सर्वजण सांगलीचे आहोत… आणि सांगलीतील प्रत्येक प्रगती हा आपल्याच प्रयत्नांचा भाग आहे. योग्य नेतृत्व, सक्षम प्रशासन आणि जागरूक नागरिक; या तिन्ही गोष्टी मिळूनच सांगलीचा विकास घडतो. aapliSangli.in हे संकेतस्थळ तयार करण्यामागील उद्देश साधा आहे — ‘सांगलीकरांना बदलत्या सांगलीचे सकारात्मक पैलू एकाच ठिकाणी जाणून घेता यावे’. त्यांनी चांगल्या कामांचे कौतुक करावे आणि ‘सरकारी यंत्रणा + नागरिक’ असा हातात हात घालून विकासाचा प्रवास पुढे न्यावा. इथे सादर होणारी माहिती म्हणजे—
- सांगलीत कुठे काय चांगले घडते आहे
- कोणत्या उपक्रमांचा नागरिकांना थेट फायदा होत आहे
- विकसित सांगलीच्या कामातील निष्ठा व परिणामातून प्रगती लक्षात यावी
- सर्वात महत्त्वाचे — बदल घडवणाऱ्या सांगलीकरांच्या कथा प्रकाशझोतात याव्यात.
जाणून घ्या ! सहभागी व्हा ! सांगली घडवा !

सांगली विशेष
इथे सांगलीतील अशा प्रमुख उपक्रमांची माहिती मिळेल, ज्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष बदल घडू शकतो. मिळून सारे हे वाचा, समजून घ्या आणि सांगलीच्या विकासाचे भागीदार बना.

यशोगाथा
जनसामान्यांनी, अधिकारी–कर्मचारी यांनी, लहान गावांनी आणि स्थानिक लोकसहभागातून घडवलेल्या मोठ्या कामगिरीची माहिती! या प्रेरणादायी कथा सांगतात, बदलाची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते.

महत्त्वाचे दुवे
उपयोगी सरकारी सेवा, माहिती आणि संदर्भदुव्यांचा एकत्र संग्रह! कारण माहिती मिळाली की नागरिक अधिक सक्षम होतात, आणि सक्षम नागरिकांतूनच सक्षम सांगली घडते.